✒️धनंजय कुंभार
सध्या चीनसोबत सीमेवर चिघळलेली परिस्थिती पाहता राफेल चे भारतीय येणे आणि भारतीय वायू सेनेमध्ये समाविष्ट होणे यामुळे भारत अधिकच शक्तिशाली बनणार आहे. शत्रूंसाठी महाघातक राफेल आपल्या सैन्यात कधी येईल याची प्रतिक्षा सर्व भारतीयांना होती आणि ती उद्या म्हणजेच २९ जुलै मध्ये संपत आहे. २९ जुलै रोजी पाहिले पाच राफेल भारतात पोहचत आहेत आणि लगेचच भारतीय वायुसेनेचा भाग बनणार आहेत. सीमावाद आणि संरक्षण मुद्यावरून शेजारी राष्ट्रांशी चिघळलेली परिस्तिथी पाहता आणि राफेल या युद्ध विमानाची वैशिष्ट्ये पाहता राफेल चे आगमन भारताचे पारडे जड करणारेच आहे, राफेल बद्दल ही माहिती पाहता राफेल हे फक्त युद्धविमान नसून शत्रूंचा काळ आहे असेच म्हणावे लागेल.....
१.राफेल या लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या दसॉल्ट या कंपनीने केलेली आहे. राफेल हे दोन इंजिन आणारे लढाऊ विमान असून, हे हवेतून मारा करणाऱ्या मिटीऑर आणि स्काल्प या क्षेपणास्त्रांनी परिपूर्ण आहे. यामुळे हवेतून मारा करण्याची क्षमता प्रचंड आहे.
२. राफेल एका मिनिटात ६० हजार फूट इतकी प्रचंड उंचीवर जाऊ शकत.
३. राफेल मल्टीरोल फायटर म्हणून ही ओळखलं जातं कारण, राफेल एकाच वेळो अनेक कामे अचूकपणे पार पाडू शकत.
४. राफेल ची मारक क्षमता ३७०० km इतकी प्रचंड आहे.
५. राफेल २४५०० kg इतके वजन घेऊन उड्डाण करू शकत.
६. राफेल अतिरिक्त जवळ जवळ ६० तास उड्डाण करू शकत.
७. राफेल चा वेग ताशी २२२३km इतका प्रचंड आहे. आणि हा वेळ राफेल अवघ्या काही मिनिटात घेऊ शकत.
८. राफेल अणुबॉम्ब पासून अँटी शिप अशा प्रकारची क्षेपणास्त्रे एकाच वेळी घेऊन उड्डाण करू शकत आणि गरज पडल्यास एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रे डागू शकत.
अशी वैशिष्ट्ये आणि अनेक सुधारणात्मक बफल करून राफेल फ्रास्न मधून भारताच्या प्रवासाला निघाले आहे, आणि लवकरचं म्हणजे दि. २९ जुलै मध्ये भारतात पोहचणार आहे. या प्रवासात, फ्रान्सहुन युएइ प्रवासादरम्यान विमान हवेत असताना इंधन भरणाऱ्या २ refuler देखील येतील.
तसेच राफेल विमान आता मीटोर एअर टू एअर मिसाइल्सने सुसज्ज असेल, ज्याची मार्क क्षमता १५० किमी आहे. त्यामुळे राफेल प्रत्यक्षात भारताची सीमा पार न करताही शत्रू देशाची विमानं नष्ट करू शकतो. मीटोर एअर टू एअर मिसाइल्स अंबाला येथे पोहोचल्याही आहेत. मुख्य म्हणजे चीन-पाकिस्तानक या दोन सतत कुरघोडी करणाऱ्या शेजारी राष्ट्रांकडे ही क्षमता नाही आहे. राफेलमध्ये जे दुसरं मिसाइल असेल ते स्काल्प आहे. ज्याची मारक क्षमता ६०० किमीपर्यंत असेल. म्हणूनच राफेल म्हणजे जणू शत्रूराष्ट्रांच्या काळंच दि. २९ जुलै ला भारतात दाखल होत आहे.
8 Comments
👍👌👌👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete👍👍
ReplyDelete👍👍
ReplyDelete🔥👍
ReplyDeleteGood
ReplyDelete👍👌👌
ReplyDelete👍👍
ReplyDelete