तेजस्विनी भोसले यांना पीएच.डी. पदवी प्राप्त


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागातील संशोधक तेजस्विनी हेमंतकुमार भोसले यांनी ‘स्त्रियांची आत्मकथने : जात, धर्म, पुरुषसत्ता आणि आत्मभान’ या विषयावर सखोल संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

या संशोधनामध्ये स्त्रियांच्या आत्मकथनांमधून व्यक्त होणारे जातीय वास्तव, धर्मव्यवस्था, पुरुषसत्ताक सामाजिक रचना तसेच स्त्रीचे आत्मभान यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. स्त्रियांच्या वैयक्तिक अनुभवांच्या माध्यमातून व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वास्तव कशा पद्धतीने प्रतिबिंबित होते, याचा संशोधनातून वेध घेण्यात आला आहे.

या संशोधनासाठी प्रा. डॉ. भारती पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच राज्यशास्त्र अधिविभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार, प्रा. डॉ. रविंद्र भणगे आणि डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. नेहा वाडेकर यांनी संशोधन प्रक्रियेत मार्गदर्शन व सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments