वैरागमध्ये अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करावी ; या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली मागणी


बार्शी |

राज्य शासनाने बार्शी तालुक्याचे विभाजन करून वैरागसह वैराग परिसरातील आजू बाजूच्या ५६ गावासाठी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी वैराग येथील सामाजिक कार्यकर्ते अमर राजे निंबाळकर यांनी दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखानेकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.

यासह त्यांनी हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देखील त्यांनी पत्रव्यवहार करून वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यासाठी मागणी केलेली आहे.

वैराग गावअंतर्गत चारमंडळ येतात यातील वैराग १० गावे, सुर्डी १४ गावे, पानगाव ८ गावे, गौडगाव १८ गावे असे एकूण ५६ गावांचा देखील समावेश होतो. नव्याने झालेल्या वैराग नगरपंचायत या सहज वैराग ग्रामीण रुग्णालय देखील मंजूर झालेले आहे.

यासह सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असे देखील सांगितले की वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय होणे हे खूप महत्वपूर्ण आहे वैराग व वैराग परिसरातील त्यासह आजूबाजूच्या ५६ खेड्यातील जनसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय दूर होऊ शकते असे सामाजिक कार्यकर्ते आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, त्यामुळे आता वैराग शहरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता वैराग शहरांमध्ये अप्पर तहसील व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमर राजे निंबाळकर यांनी केले आहे.

वैराग भागाची वाढती लोकसंख्या मोठे शेत्रफळ यामुळे सद्यस्थितीमध्ये बार्शी तहसील कार्यालयावर मोठा ताणतणाव निर्माण होत आहे प्रशासकीय सुविचादृष्टीने वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय करणे शक्य असल्याचे निवेदनात नमूद केले आहे वैरागमध्ये शासकीय जागा कार्यालय इमारती उपलब्ध असल्याने अप्पर तहसील साठी काही अडचण निर्माण होऊ शकणार नाही. तरी वैराग भागाला अप्पर तहसील कार्यालयाची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमर राजे मुकुंदराव निंबाळकर यांनी पत्रव्यवहारांमध्ये केलेली आहे

Post a Comment

0 Comments