मोहोळ पोलिसांची तत्परता; १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला


मोहोळ, प्रतिनिधी : मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत असलेला एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह पोलिसांच्या तत्पर व संवेदनशील कार्यवाहीमुळे रोखण्यात आला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षित ताब्यात घेतले असून, पुढील संरक्षण व काळजीसाठी बालकल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर सादर केले.

अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API गणेश कोल्हाड, हेडकॉन्स्टेबल संतोष माने, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद माळी, धनाजी घोरपडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी गुंड यांनी तातडीने कार्यवाही केली.

पोलिसांनी तत्परतेने मुलीचा शोध घेत तिला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या संरक्षणासाठी बालकल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर सादर करण्यात आले. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे अल्पवयीन मुलीचे बालपण, शिक्षण, सुरक्षितता आणि भवितव्य जपण्यास मदत झाली.

बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेविरोधात मोहोळ पोलिसांनी दाखविलेली तत्परता व संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली आहे. या कार्यवाहीबद्दल बाल कल्याण समिती, सोलापूर यांच्या अध्यक्ष व सदस्यांनी संबंधित अधिकारी व पोलीस अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments