परंडा तालुक्यातील राजुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमास आबा गोरे, दादा वाघचौरे, गोवर्धन लटके, नाना गोडगे, अनंत अहिरे, भैरवनाथ गोडगे, महादेव गोडगे, रामलिंग लटके, हनुमंत लुगडे, सज्जन गोडगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.
0 Comments