परंड्यात तरुणीवरील लैंगिक अत्याचार; तरुणासह आईविरुद्ध गुन्हा


परंडा : लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आलांपरंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित तरुणाने लग्न करण्याचे आश्वासन देत तरुणीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपी तरुण व त्याच्या आईने गर्भपातासाठी गोळ्या दिल्याने गर्भपात झाल्याचा आरोप आहे. पीडितेने २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ८८ व ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments