परंडा : तालुक्यातील एका गावातील १७ वर्षे ५ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ८.३० ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान सुरू झालेला हा प्रकार दि. १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजेपर्यंत सुरू होता. आरोपीने पीडितेला, "माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन," अशी धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच दोघांमधील संबंधांचे छायाचित्रण करून ते व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पीडितेने दि. २० जुलै २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(एम), ७४, ३५१(२) तसेच बाल लैंगिक अपराध संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ४, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करीत आहेत.
0 Comments