आज दिनांक २५जुलै २०२६ रोजी आषाढ एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कपिलापुरी येथे बाल दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.
यामध्ये बाल वारकरी मोठ्या उत्साहाने विविध वेशभूषा मध्ये सहभागी होऊन रममान झाले .दिंडी सोहळ्यासाठी आकर्षक पालखी तयार करण्यात येऊन तिची मिरवणूक संपूर्ण गावभर काढण्यात आली. दिंडी संपूर्ण गावांमधून जात असताना कपिलापुरी येथील महिला वर्ग व पुरुष मंडळी यांनी दारासमोर रांगोळी काढून मोठ्या उत्साहात या पालखीचे स्वागत केले.
ठिकठिकाणी विठ्ठल रखुमाई च्या वेशात असलेले बाल वारकरी यांची विधिवत पूजा महिलांनी मोठया भक्तिभावाने केली. सर्व बाल वारकरी व उपस्थित नागरिक यांना आषाढी एकादशीचा फराळ व चहा, केळी नागरिकांकडून उस्फूर्तपणे वाटप करण्यात आला.
मोठ्या उत्साहामध्ये या दिंडीचे आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या वतीने करण्यात आले. या दिंडी सोहळ्यासाठी अतिशय मोलाची साथ गावचेच नागरिक असलेले श्री बाळासाहेब काशीद व श्री मोहन माने यांनी संपूर्ण दिंडी सोहळ्यासाठी विविध प्रकारचे अभंग गायन करून दिंडीमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
या बाल वारकरी दिंडी मुळे संपूर्ण कपिलापुरी गावचे वातावरण भक्तीमय झाले. या बाल दिंडी सोहळ्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व समितीचे सदस्य त्याचबरोबर शिक्षण प्रेमी नागरीक, युवक मंडळ, भजनी मंडळ, विशेष करून महिला मंडळ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेवटी दिंडीतील सर्व सहभागी वारकरी ग्रामस्थ यांच्यासाठी गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांकडून येथेच्छ फराळाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले .त्यामुळे सर्व शाळा परिसर हा भक्तीरसात नाहुन निघाला. या दिंडीत बाल वारकरी यांनी गावामध्ये ठिकठिकाणी दिंडीचे पाऊल, विविध प्रकारच्या फुगड्या खेळून व अभंग गायन करून आनंद लुटला.
दिंडीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव मिळाल्याने संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मुख्याध्यापक श्री शिवाजी पंडित व शिक्षिका श्रीम.साधना शिंदे या दोन्ही शिक्षकांचे मोठे कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.
या दिंडी सोहळ्याच्या यशसवी आयोजना साठी शिक्षण प्रेमी युवक ॲड. रणजीत पाटील,आरोही सचिन पाटील,प्रशांत उपाध्ये,विलास भोसले,अनिल देवळकर, सोमनाथ बोडरे,समाधान कुंभार, पोपट बोडरे, बाळासाहेब काशीद,मोहन माने, युवराज मसलकर ,श्याम मसलकर, नवनाथ शिंदे, चंद्रकांत कुंभार, बाळासाहेब शिंदे,अंबादास डाके यांच्यासह अनेक शिक्षण प्रेमी नागरिक यांचे सहकार्य लाभले.
0 Comments