ठाकरेंची सत्ता असणारी एकमेव महापालिकेतील सत्ता जाणार? एकनाथ शिंदे यांचा नवा डाव


ऑपरेशन टायगर राबवून शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फोडले. या ऑपरेशननंतर राज्यात ठाकरेंचे 14 आमदार लवकरच पक्ष सोडणार, मुंबईसह राज्यातील विविध महापालिका, नगरपालिकेतील नगरसेवकही ठाकरेंची साथ सोडणार, असा दावा स्थानिक शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे.

ऑपरेशन टायगरचे शिकार झालेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रयत्नातून महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली होती. सय्यद इकबाल या मुस्लिम हऱ्याला महापौर करत संजय जाधव यांनी मोठी खेळी केली होती. यावरून उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर चोहोबाजूंनी टीकाही झाली. मात्र, खासदार संजय जाधव यांनी आता शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर परभणी महापालिकेची सत्ताही उद्धव ठाकरे यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून परभणी महापालिकेसाठी 19 कोटी रुपयांचा निधी आणत खासदार जाधव यांनी एक नवा डाव टाकला आहे. परभणी महापालिकेसाठी आलेला हा 19 कोटी रुपयांचा निधी खासदार संजय जाधव समर्थक शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागांमध्येच खर्च केला जावा, अशा स्पष्ट सूचना यादीसह संबंधितांना देण्यात आल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विवेक नावंदर यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला बोलताना केला आहे.

Post a Comment

0 Comments