महागाई, बेरोजगारी व मतदार यादीतील त्रुटींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर निवेदन


परंडा : 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या तालुकानिहाय जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज परंडा तहसील कार्यालयात विविध जनहिताच्या प्रश्नांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी महागाई, वाढती बेरोजगारी, डिझेल दरवाढ, पेपरफुटी तसेच SIR आणि मतदार यादीतील त्रुटी या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष किरण कराळे, जिल्हा सचिव सुहास ठोंगे, शहराध्यक्ष शहाबर्फीवाले सर, युवक तालुका अध्यक्ष प्रवीण गरड, उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, जिल्हा संघटक अमोल सुरवसे, दशरथ चाबुकस्वार, तालुका युवा कार्याध्यक्ष सज्जन गोडगे, माजी सैनिक तालुकाध्यक्ष सुरेश कुंभार, सोमनाथ भोईटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.

Post a Comment

0 Comments