राज्यातील लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आक्रमक भूमिका घेत असून शनिवारी (6 जून) एकाच दिवशी दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या. एका प्रकरणात पोलीस अंमलदाराला लाच घेताना अटक करण्यात आली, तर दुसऱ्या कारवाईत जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
एसीबीच्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील गोंदी परिसरात सुरू असलेल्या वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी संबंधित वाहतूकदाराकडे दरमहा 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 6.40 लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि छत्रपती संभाजीनगर येथे चव्हाण यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.
या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी वाळूमाफियांविरोधातील कारवायांमुळे विजय चव्हाण चर्चेत आले होते.
0 Comments