सोलापूर : सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशा परिस्थिती भीमा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. भीमा नदीकाठच्या अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना आडचणीत आल्या होत्या. त्यामुळे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही पाणी प्रश्न ऐरणीवर होता. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन परवानगी घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री 9 वाजले पासून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना शेवटच्या घटका मोजत होत्या, त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी संघटना, आमदार, खासदारांनी सातत्याने केली होती. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसापूर्वी आकस्मिक टंचाईची बैठक घेतली होती. तसेच गेल्या १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि प्रमुख अधिकार्यांची ऑनलाईन बैठक घेवून पाणी टंचाईचा आढावा घेतला हेाता. यावेळी सर्वानींच पाणी सोडण्याची जोरदार मागणी लावून धरली होती. याचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची परवानगी घेतली. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.
गुरुवारी रात्री पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तात्काळ मंजुरी दिल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोघांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थ आणि पशुपालकांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे.
जलसंपदा विभागाचा प्रस्ताव आणि गोरेंचा आग्रह
यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे अलनिनोचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत शासनाच्या सक्त सूचना होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील जलसंपदा अधिकार्यांनी तातडीने प्रस्ताव शासनाला सादर केला होता. तर तो मंजूर व्हावा यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन सर्वांची परवानगी मिळवली आहे. त्यामुळे उजनीतून आता भिमा नदीत पाणी सोडण्यची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.
...
0 Comments