खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत्याने केली 21 वर्षीय पुतण्याची हत्या


धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत्याने पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विलास शेळके या आरोपीने आपल्या पुतण्या सुजित शेळके याच्या पोटावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. 

जमीन व्यवहारातून दोघांमध्ये वाद सुरू होता. रात्री सुजित शेळके आजी-आजोबांसोबत झोपलेला असताना आरोपीने शिवीगाळ करत वाद उकरून काढला. पुढे हा वाद भांडणात बदलून आरोपीने चाकूने वार करत हत्या केली. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments