सोलापूर : पंढरपूरचे नेते भागीरथ भालके यांनी दोन दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश प्रसंगी भाषण करताना त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना एकेरी भाषा वापरून टार्गेट केले.
भालके म्हणाले होते, नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्याचा पालकमंत्री आम्हाला हिणवत होता, भालकेजी निवडून आल्यानंतर निधी मागायला कोणाकडे जाणार, माझ्याकडेच यावे लागेल असे म्हणून हिणवले होता पण आता सांगतो अरे निधी देणारा येथे बसलाय.
दरम्यान या वक्तव्यानंतर पत्रकारांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना या प्रकरणी विचारले असता त्यांनी, दिवंगत भारत नाना आणि माझे संबंध काय होते हे भगीरथ यांना माहीत नसावे, त्यांनी पाणी प्रश्नी मुंबईत एक महिना होते, त्यांना मी मदत केली, माझ्या मतदारसंघाचा संबंध नसताना.अरे तुरेची भाषा वापरून त्यांनी आपली संस्कृती दाखवली हे भारत नानांना अपेक्षित नाही.
उलट भगीरथ यांनी मला बोलायला भाग पाडू नये, ते मला कधी भेटले, कशासाठी भेटले मी सांगू का? निवडणुकीच्या व्यासपीठावर आरोप प्रत्यारोप होत असतात. आता त्यांना माझ्या निधीची गरज पडणार नाही कारण त्यांना निधी देणारे मोठे माणसे भेटले आहेत.
0 Comments