परंडा दि २८ ( प्रतिनिधी )
पत्रकाराला अरेरावी व जातीवाचक अपशब्द वापरणारे नगरपरिषदेचे कार्यालयीन कर्मचारी जगदीश सोंडगे यांची प्रशासकीय चौकशी करून त्यांना सेवेतुन निलंबित करण्याची मागणी परंडा तालुक्यातील पत्रकारांनी मंगळवार दि २८ रोजी तहसीलदार यांच्या मार्फत प्रशासणाकडे केली आहे.
पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि २६ एप्रिल रोजी शहरातील पत्रकार निसार मुजावर यांनी मुजावर गल्ली भागात दोन तीन दिवसापासून कचऱ्याची घंटा गाडी आली नसल्या याबाबत नगरपरिषदचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्याकडे विचारणा केली असता सोंडगे यांनी पत्रकार निसार मुजावर यांची समस्या ऐकून घेता आरेरावी व शिवीगाळ केली आहे . शहरातील नागरीक नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंवाद आसणे, नागरिकांच्या समस्याचे निराकरण करणे गरजेचे असताना कर्मचाऱ्याकडून पत्रकारांशी हुज्जत आणि अरेरावी करणाऱ्या कर्मचार्याचा निषेद व्यक्त करून त्यास निलंबित करण्याची मागणी करण्यात आली .
या वेळी परंडा तालुक्यातील सर्व संघटनांचे पत्रकार बांधव उपस्थित होते. निसार मुजावर सुरेश घाडगे, आनंद खर्डेकर, प्रमोद वेदपाठक, अविनाश ईटकर , विजय माने, मुजीब काझी, आशुतोष बनसोडे, प्रशांत मिश्रा भजनदास गुडे, गोरख देशमाने, राहुल बनसोडे, तुकाराम गंगावणे, सुहास मस्के, रावसाहेब गायकवाड, सचिन कुलकर्णी, सदाशिव डाके, फारुक शेख, तानाजी घोडके, सुरेश भागडे, गणेश राशनकर परंडा तालुक्यातील विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना देण्यात आले
0 Comments