उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना माहेरावरून दोन लाख रुपये घेउन म्हणून पतीने विवाहितेचा छळ करून गळा आवळला. शहरातील या घटनेने पूर्ण शहर हदरले दि 17रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. खून झालेल्या विवाहितेचे नाव पलक दत्ता कांबळे (वय 22)असे आहे या प्रकरणी मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादिवरून उमरगा पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी केशर धनाजी शिंदे (रा कुंभारपट्टी उमरगा )यांची मुलगी पलक हिचे लग्न तीन वर्षांपूर्वी उजळंब (ता बसवकल्याण जी बिदर )येथील दत्ता श्यामराव कांबळे (वय 27)याच्याशी झाले होते. दत्ता कांबळे हा दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता.
आता त्याला दुचाकी रिपेरिंग चे दुकान टाकण्यासाठी पैसे लागणार होते. यासाठी पत्नी पलक हिला माहेरून दोन लाख रुपये घेउन ये म्हणजे मानसिक व शरीरिक छळ करत होता. व सासरच्या मंडळींनी व पती दत्ता याने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली होती. मात्र दि 17च्या रात्री तिचा कशाच्या तरी साहाय्याने गळा आवळून खून केला.या प्रकरणी मृत पलक ची आई केशर शिंदे यांच्या फिर्यादिवरून शनिवारी दि 18रोजी सायंकाळी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे करत आहेत.
0 Comments