बार्शीत डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्नशहर अध्यक्षपदी गणेश शिंदे, ग्रामीण अध्यक्षपदी संतोष कानगुडे यांची नियुक्ती


बार्शी (प्रतिनिधी) दि. ११ :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हक्कांसाठी, संरक्षणासाठी व कल्याणासाठी कार्य करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. पत्रकारांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे, पत्रकारांना कायदेशीर मदत, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य परिषदेमार्फत केले जाते.

या परिषदेच्या डिजिटल विंग अंतर्गत कार्यरत डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन च्या विस्ताराला बार्शीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, त्यानिमित्ताने बार्शीत पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मानाचे फेटे बांधून पुष्पगुच्छ देत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नियुक्ती स्वीकारताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास दिसून येत होता. संघटन मजबूत करून जोमाने आणि नेटाने पुढील कार्यासाठी दिशा ठरवण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. पत्रकारितेच्या क्षेत्रात नवा विश्वास, नवी ऊर्जा आणि नवी दिशा देणारा हा सोहळा ठरला.

यावेळी सोलापूर जिल्हा (पश्चिम) कार्यकारिणीचे अध्यक्ष विनोद ननवरे (माझा न्यूज), उपाध्यक्ष विजय कोरे (महाराष्ट्र डिजिटल न्यूज), सचिव संजय बोकेफोडे (दैनिक लोकमत), सहसचिव बाबासाहेब शिंदे (दैनिक सकाळ), खजिनदार अजय पाटील (विजेता टाइम्स) उपस्थित होते. 

या जिल्हा कार्यकारिणीने बार्शी शहर व ग्रामीण भागातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
बार्शी शहर कार्यकारिणी जाहीर
अध्यक्ष : गणेश शिंदे (G मराठी न्यूज व दैनिक संचार)
उपाध्यक्ष : अभिजीत शिंदे (VS Marathi News व दैनिक माझा मराठी समाचार)
सचिव : निलेश उबाळे (माय मराठी न्यूज व दैनिक सह्याद्रीचा राखणदार)
सहसचिव : अमीन गोरे (Star One News)
खजिनदार : समाधान विधाते (SV मराठी न्यूज)
सदस्य : स्वप्निल पोफळे (समर्थ मराठी न्यूज), सचिन साळवे (फस्ट न्यूज), संदीप सुतार (आवाज माझा)
मार्गदर्शक : रमेश गायकवाड, रमण कारंजकर
कायदेशीर सल्लागार : शंकर ननवरे

बार्शी ग्रामीण कार्यकारिणी जाहीर
ग्रामीण भागातील बातम्यांना न्याय मिळावा व ग्रामीण पत्रकारांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
अध्यक्ष : संतोष कानगुडे (दैनिक सकाळ)
उपाध्यक्ष : काशिनाथ शिरसागर (दैनिक पुढारी)
सचिव : विश्वनाथ सोनवणे (VS न्यूज 86 गाव गावची बातमी व दैनिक लोकमत)
सहसचिव : राजेश भोगे (दैनिक दिव्य मराठी)
खजिनदार : बालाजी देवकते (दैनिक सह्याद्रीचा राखणदार व “HATKAR NEWS मराठी” मुख्य संपादक)
सदस्य : शांतीलाल काशीद (दैनिक सकाळ), अर्जुन गोडगे (लोक वार्ता)
महिला आघाडी प्रमुखपदी राजश्री गवळी
संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख म्हणून राजश्री गवळी (लोकराज न्यूज २४ व दैनिक माझा मराठी समाचार) यांची निवड करण्यात आली आहे.

पत्रकारितेच्या मूल्यांवर भर
या सोहळ्यात “पारदर्शकता, कर्तव्यनिष्ठता आणि निष्पक्षता” हे पत्रकारितेचे मुख्य स्तंभ असल्याचे ठामपणे अधोरेखित करण्यात आले. संघटनेच्या नियम व घटनेचे काटेकोर पालन करून समाज व पत्रकार यांच्यात विश्वासाचा मजबूत सेतू उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देणे, पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याचा निर्धारही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

चर्चा, मनोगत, फोटोसेशन व अल्पोपहार
पदग्रहण सोहळ्यात नियम व अटींसह विविध विषयांवर चर्चा झाली. प्राथमिक स्वरूपात सर्वांनी मनोगत व्यक्त केले. व्यवसाय करत करत पत्रकारिता करणे आणि संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देणे यावर उपस्थितांचे एकमत झाले. त्यानंतर फोटोसेशन पार पडले व अल्पोपहारानंतर पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी अधिक सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश उबाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभिजीत शिंदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments