✒️संकलन - ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी-नुकतेच संघटनेच्या निदर्शनास आलेल्या काही बेकायदा सावकारीच्या प्रकरणांमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये लोकांकडून अगदी रु. २ लाख मूळ कर्ज रक्कमेवर १५ लाखाहून अधिक रक्कम व्याज म्हणून बेकायदा सावकारीद्वारे आकारल्याचे पुण्यासारख्या आणि तेही सुशिक्षित व्यक्तींकडून घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतरही त्यांचेकडून त्यांचे जमिनी, फ्लॅट, कुटुंबातील स्त्रियांचे दागिने ई . बळकाविण्यापर्यंत अशा गुन्हेगारांची मजल गेल्याची प्रकरणे समोर आली आहेत. ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी बांधव की ज्यांच्या हितरक्षणासाठी प्रामुख्याने हा कायदा लागू करण्यात त्या बळीराजाचे कर्जास कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. कायद्याचे अज्ञान हे त्याचे खूप मोठे कारण असून त्यांना कुठेतरी मदत व्हावी या जाणीवेतून ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी’ हा ब्लॉग संघटनेतर्फे जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ बद्दल माहितीच नसणे, सामान्यांना राक्षसी चक्रवाढ करून अशा पद्धतीने लुटण्याचे प्रकार पुण्यासारख्या शहरात की ज्यास देशाची सांस्कृतिक राजधानी समजले जाते तिथे घडत आहेत हे धक्कादायक आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील तर कल्पनाच केलेली बरी. परिणामी तूर्तास या कायद्यातील काही महत्वाच्या निवडक तरतुदी मराठीतून देण्यात येत आहेत की जेणेकरून ते ग्रामीण भागात की जिथे अशा बेकायदा सावकारीमुळे कित्येक निष्पाप लोकांना होणारा सावकारांचा जाच आणि त्रस्त होऊन आत्महत्येचा दुर्दैवी व चुकीचा मार्ग अवलंबिण्यापेक्षा या कायद्याचा वापर करून लढण्यास थोडी तरी प्रेरणा मिळेल अशी आशा करीत आहे.
थोडक्यात प्रामुख्याने शेतकरी बांधवांसाठी तसेच महाराष्ट्रात बेलगाम सावकारीचे नियमन करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे.
आता या कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदी पहा-
कलम २ (३) नुसार ‘सावकारीचा धंदा’ याची व्याख्या खालीलप्रमाणे दिली आहे-
कलम ३ हे यासंबंधी राज्य शासनाने नेमणूक करायच्या अधिकारींबाबत माहिती देते ते खालीलप्रमाणे-
आपल्या विभागात कोणते अधिकारी नेमले आहेत व कुणाकडे तक्रार करावी यासंबंधी सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर बघावे. त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1124/Home
वेबससाईटवर गेल्यावर ‘संपर्क’वर क्लिक करून ‘प्रशासन शाखा’ वर पुन्हा क्लिक करावे त्यानुसार आपल्या विभागात कोणत्या अधिकारीस तक्रार करता येईल याबाबत माहिती मिळेल किंवा आपणास सोपे व्हावे म्हणून ती लिंक खाली देत आहे-
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1078/Admin-Wing
(या लिंकवर राज्यभरातील अधिकारींचे की ज्यांच्याकडे आपण बेकायदा सावकारीबद्दल तक्रार करू शकता त्यांचे संपर्क क्रमांक तसेच ई-मेल आय डी दिले आहेत. त्याचा जरूर वापर करावा).
सर्वात महत्वाचे म्हणजे सावकारी धंद्याबाबत सुरु असलेल्या कित्येक प्रकरणांची माहितीसुद्धा व अंतिम आदेशही या वेबसाईटवर दिली आहे. कित्येक पीडीएफ फाईल स्वरूपात अशा केसेसची माहिती अपलोड करण्यात आली असून ती खालील लिंकवर जरूर वाचावी व त्याचा अभ्यास करावा. त्याची लिंक खालीलप्रमाणे देत आहे-
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1162/Money-Lender-Information
महत्वाचे- आमचे अँड्रॉईड ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि सर्व लेख डिजिटल पुस्तक स्वरूपात मोबाईलमध्ये वाचा!!
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कायद्यांतर्गत कर्जासाठी व्याजदराची माहिती
काही इतर महत्वाच्या तरतुदी-
कलम ५ नुसार,
सावकारी करण्यासाठी अशा दुय्यम निबंधकास त्यांनी परवानासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये स्वतःचे खरे नाव, सावकारी करण्यासाठी कोणते ठिकाण हवे आहे ते ई .सर्व माहिती देणे त्यावर कायद्याने बंधनकारक आहे.
कलम १४ नुसार,
कोणत्याही नागरिकास जर एखाद्या सावकारीचे परवाना मिळालेल्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे कायद्याचा भंग केले असल्यास जिल्हा निबंधकाकडे त्याचा परवाना रद्द करण्यास अर्ज करू शकेल.
अत्यंत महत्वाचे कलम १८ नुसार,
कलम १६ व १७ च्या तपासणी अधिकार अंतर्गत जर जिल्हा निबंधकास कोणत्याही व्यक्तीकडून कर्ज घेतले म्हणून त्याची कर्जाच्या व्याज म्हणून अथवा मोबदला म्हणून विक्री, गहाण, भाडेपट्टा या प्रकाराने कर्जदाराचा अर्ज मिळाल्यापासूनच्या १५ वर्षांच्या आत सावकाराने अशा व्यक्तीची स्थावर मालमत्ता मिळवली असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल व जर अशा चौकशीत सावकारीच्या ओघात अथवा त्या बदल्यात अशी स्थावर मालमत्ता सावकाराने मिळविल्याचे सिद्ध झाल्यास इतर कोणत्याही कायद्यात काहीही नमूद असले तरी जिल्हा निबंधक लेखी कारण नोंदवून असे हस्तांतरण रद्द करण्याचा तसेच मूळ कागदपत्रांसाहित अशी स्थावर मालमत्ता मूळ मालक अथवा त्याच्या वारसदारास देण्याचे आदेश देईल!
(सावकारीद्वारे लोकांच्या मुख्यतः जमिनी बळकाविण्याच्या प्रकाराविरोधात अशी कठोर तरतूद करण्यात आली आहे. बेकायदा सावकारीने व्याजासाठी जमिनी बळकाविले असल्यास त्या संबंधिताना परत करण्याची तरतूद या कायद्यात अशाप्रकारे करण्यात आली आहे.)
कलम २४ नुसार,
प्रत्येक सावकारावर देण्यात आलेले कर्ज तसेच हिशोब ई.ची व्यवस्थित नोंद ठेवण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. तसेच ते कर्जदारास वेळोवेळी देण्याचे कायद्याने बंधन व तशी प्रक्रियाही विहित करण्यात आली आहे. तसेच सावकाराने कर्जदारास दिलेल्या अशा नोंदी मान्य करण्याचे बंधनही कर्जदारावर नाही असे कलम २७ द्वारे स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.
अत्यंत महत्वाचे- कलम ३१ नुसार
राज्य सरकार हे व्याजाचे दर निश्चित करेल व त्याहून अधिक व्याजदर तसेच चक्रवाढ पद्धतीनेही कुणासही व्याज घेता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे व्याजदर तूर्तास उपलब्ध नाही, ते लवकरच याच ब्लॉगमध्ये अपडेट करण्यात येईल.याहून म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही कायद्यात काहीही नमूद असले तरी ‘मुद्दल रक्क्मेहून अधिक व्याज घेणार नाही’ भले सावकाराकडून असे कर्ज हा कायदा येण्याआधी घेण्यात आले असो अथवा कायदा अस्तित्वात आलेनंतर असो, अशी कठोर तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच रु.१,००,०००/ कर्ज दिले असेल तर जास्तीत जास्त व्याज १,००,०००/- इतकेच व्याज सावकारास आकारता येईल (तेही राज्य सरकारने ठरविलेल्या व्याजदारास अधीन राहून) अशी तरतूद करण्यात आली आहे.
महत्वाचे- उदा. सरकारने समजा व्याजाचे दर १०% वार्षिक या दराने कायद्याने जाहीर केले आहे , तर रु.१,००,०००/- (एक लाख रुपये) इतक्या रक्कमेवर वर्षाला सावकारास केवळ १००००/- (रुपये दहा हजार) इतके व्याज घेता येईल व ते साधारण १० वर्षानंतर रु.१,००,०००/- व्याज वसूल केल्यास ते कर्ज फेडण्यात आले असे गृहीत धरण्यात येईल.
अत्यंत महत्वाचे- कलम ३९ नुसार,
कोणतीही व्यक्ती जी विना परवाना सावकारीचा धंदा करीत असेल त्यास दोषी आढळलेनंतर ५ वर्षांचा कारावास तसेच रु.५०,०००/- पर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
तर कलम ४४ नुसार, राज्य सरकारने ठरविलेल्या व्याजदराहून अधिक व्याजाची आकारणी केल्यास पहिल्या अपराधासाठी रु.२५,०००/- दर दुसऱ्या अपराधासाठी रु.५०,०००/- इतके दंड होऊ शकेल.
अत्यंत महत्वाचे, कलम ४५ नुसार,
जी व्यक्ती कर्ज वसुलीसाठी उपद्रव देईल अथवा उपद्रव देण्यास इतरास प्रवृत्त करेल, म्हणजे अन्य व्यक्तीवर अडथळा निर्माण करेल, बळाचा वापर करेल, कर्जदाराच्या मालमत्तेत ढवळाढवळ करेल, जागोजागी पाठलाग करेल, राहण्याच्या तसेच व्यवसायाच्या जागी त्रास देईल, अशा ठिकाणी धाकटपडशा वाटेल असे कोणतेही कृत्य करेल अशा व्यक्तीस दोषी आढळलेनंतर २ वर्षांचा कारावास किंवा रु.५०००/- दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
तर कलम ४६ नुसार-
कायद्यातील इतर कोणत्याही तरतुदीचे पालन करत नसेल अथवा भंग करेल व ज्याबाबत कायद्यात स्पष्ट शिक्षेची तरतूद नसेल अशा व्यक्तीस पहिल्या अपराधासाठी १ वर्षापर्यंत तर दुसऱ्या अपराधासाठी २ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकेल.
इतकेच नाही तर कलम ४८ अन्वये –
कलम ४ चे उल्लंघन केलेबद्दल कलम ३९, कलम ४१ अन्वये पात्र शिक्षेबद्दल अपराध,
तसेच कलम २३ चे उल्लंघन केलेबद्दल कलम ४२ अन्वये असलेले अपराध,
उपद्रव केलेबाबत कलम ४५ अन्व्येचे अपराध-
हे सर्व अपराध दखलपात्र असल्याची तरतूद करण्यात आली आहे.
एकंदरीत प्रामुख्याने शेतकरी बांधव तसेच बेकायदा सावकारीच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीस न्याय मिळवून देण्यासाठी असे कठोर कायदे व कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थातच गुन्हा सिद्ध करणे व न्याय मिळविणे हे सोपे नसले तरी संघटनेच्या निदर्शनास आल्याप्रमाणे लोकांना असे कायदे आणि त्यातील तरतुदीच माहित नाहीत परिणामी लढा न देताच ते हार मानतात हे दुर्दैवी आहे. तरी वरील कायदा व तरतुदी यांचा बेकायदा सावकारीने त्रस्त प्रत्येक व्यक्ती विशेषतः शेतकरी बांधव वापर करतील, लढतील, काळी मातीत राबणारे हात कायद्याची लढाईसुद्धा अशाच मेहनतीने आणि जिद्दीने लढतील ही अपेक्षा..जयहिंद!
हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks
ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)
सूचना- कायदा हे वेळोवेळी बदलत असतो कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
0 Comments