संतोष पाटलांसाठी उमेश पाटील प्रचारात ; आमच्या इलाक्यात तुमची दादागिरी चालू देणार नाही


मोहोळ : मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. राजन पाटील यांना उमेश पाटील यांनी संतोष पाटील या दोन्ही भावांनी आव्हान दिले आहे. नरखेड जिल्हा परिषद गटातून संतोष पाटील आणि कुरुल जिल्हा परिषद गटातून उमेश पाटील रिंगणात आहेत. या निवडणुकीत अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेना यांची युती आहे. तुतारीचे आमदार राजू खरे हे सुद्धा या युतीच्या बाजूने आहेत. 

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष नरखेड आणि कुरुल या दोन गटाकडे लागली आहे. संतोष पाटील यांनी नरखेड भागात सीना भोगावती कालव्यासाठी मंजूर केलेला निधी हा प्रचारातील प्रमुख मुद्दा आहे. त्याचबरोबर मागील आठ वर्षांमध्ये जिल्हा परिषदेतून उमेश पाटील यांनी केलेली विकास कामे या जोरावर संतोष पाटील मते मागत आहेत. 

कुरुल मध्ये टशन असताना सुद्धा त्यातून वेळ काढून उमेश पाटील यांनी मोठे बंधू संतोष पाटील यांच्यासाठी सभा घेतल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळतोय. या सभेमध्ये उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील, त्यांचे चिरंजीव बाळराजे पाटील, माजी आमदार यशवंत माने यांनाच टार्गेट केले. गेल्या पावसाळ्यात सीना नदीला महापूर आला होता या महापुरात अनगरचे पाटील आणि त्यांची मुलं कुठे होती असा प्रश्न करत उमेश पाटील यांनी त्यांना डीवचले. 

अजित पवारांचा पक्ष आणि घड्याळ संपवण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत. कुरुल मधून उमेश पाटील आणि नरखेड मधून संतोष पाटीलचा पराभव करायचा आहे, म्हणून संपूर्ण मोहोळ तालुक्यात फिरत आहेत पण तुमची साथ पिढी आली तरी हा संतोष पाटील आणि उमेश पाटील पडत नाही हा शहाजीराव पाटील यांचा इलाका आहे, तुमच्या लोकनेत्याचा नाही, आमच्या इलाक्यात तुमची दादागिरी चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments