सोलापूर : विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सोलापुरातील एका उद्योजकाने अकराव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजता घडली.
सुनील सदारगांनी (वय 59) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. सदा रंगांनी हे पनाश अपारमेंट मध्ये अकराव्या मजल्यावर राहत होते. गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यानी आपल्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात ते जागीच गतप्राण झाले. या घटनेनंतर आपारमेंटमधील लोकांचे गर्दी झाली.
विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. होटगी रोडवर मुलतानी बेकरी या नावाने सदारंगांनी यांचे मोठी बेकरी होती. मुलतानी या ब्रेड एकेकाळी सोलापुरात गाजलेला ब्रँड होता. काही वर्षांपूर्वी हे बेकरी बंद पडली. त्यानंतर अनेक संकट आल्यामुळे परिस्थिती बिघडली त्यामुळे गेले काही दिवस ते तणावात होते असे सांगण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 Comments