परमेश्वर परम सेवा फाउंडेशन प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक उपक्रम


नाईकवाडी गावात प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वानिमित्त परमेश्वर परम सेवा फाउंडेशन यांनी सामाजिक जबाबदारी जपत शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आवड निर्माण करणे, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीस प्रोत्साहन देणे हा होता.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच शाळेकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप , नृत्य कलेचे सर्टिफिकेट आणि खाऊ वाटप करण्यात आले, ज्यामुळे शिक्षणासाठी त्यांना नवे बळ मिळाले.

या सामाजिक उपक्रमाला नाईकवाडी गावाचेग्रामसेविका सौ. बत्तीसे मॅडम, ग्रामपंचायत सरपंच- श्री विलास बदादे सर, भास्करभाऊ खोसकर, श्री. सुखदेवभाऊ खोसकर, श्री. दत्ताभाऊ लीलेके, श्री. लालू गुंबाडे, श्री. शरद बेंडकोळी,  सोमनाथ निपळूंगे, उल्हास बेंडकोळी, कृष्णा टोंगारे,निवृत्ती टोंगारे, सावळीराम बाबा , राणू बेंडकोळी , नरेंद्र दिवे .. लक्ष्मण जावळे ' झानेश्वर गुंबाडे संतोष निपळुंगे. गोरख वाघमारे सोमनाथ गायकवाड जनार्दन निपळुंगे संदीप गायकवाड, पंडीत निपळुंगे, गोरख निपळुंगे, सुभाष वाघमारे, सुभाष निवळुंगे, काळू बेंडकोळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री शेवाळे सर, अंगणवाडीच्या थेटे मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उल्हास जाधव सर यांनी केले. नृत्य संकल्पना श्रीमती स्मिता पाटील मॅडम व श्रीमती भोये मॅडम यांनी यशस्वीपणे साकारली. बैठक व्यवस्था श्री चौटे सर, श्री नंदन सर व श्री बस्ते सर यांनी पाहिली.  तसेच परमेश्वर परम सेवा फाउंडेशनचे प्रोग्राम मॅनेजर श्री. सुमित देबाजे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत शिक्षण व समाजविकासासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

परमेश्वर परम सेवा फाउंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा नाईकवाडी यांनी राबवलेला हा उपक्रम शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम ठरला.

Post a Comment

0 Comments