वैराग–बार्शी रोडवरील एका भीषण अपघाताने संपूर्ण मानेगाव आणि पंचक्रोशी हादरून गेली. सकाळी दत्तात्रय पाखरे (रा.मानेगाव ) त्यांचा ०२ वर्षांचा नातू शंभू याची तब्येत ठीक नसल्याने दवाखान्यात घेऊन आले होते.दवाखान्यातून घराकडे जात असताना बार्शी रोडवरील छत्रपती कार केअरसमोर सकाळी घडलेल्या या अपघातात दोन वर्षांचा चिमुरडा शंभू भारत पाखरे याचा जागीच मृत्यू झाला.तसेच शंभूचे आजोबांचा दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला.
अचानक समोरून आलेल्या भरधाव टिप्परने थेट दुचाकीवर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, आजोबांच्या कुशीत बसलेल्या शंभूचा जागीच मृत्यू झाला.आजोबाही गंभीर जखमी झाले.धडकेनंतर दुचाकीने पेट घेतला; आगीच्या लपेट्यात आजोबा व नातू दोघेही भाजले गेले.
दरम्यान झालेल्या अपघाताची भीषणता पाहून टिप्पर चालक गाडी वेगाने घेऊन पसार झाला. मात्र नागरिकांनी त्याच्या गाडीचा क्रमांक नोंदवून पोलिसांकडे दिला असून तपास सुरू आहे.
0 Comments