राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून गुन्हा दाखल करासोलापूर |

संसदेतील विरोधीपक्षनेता आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी स्वीकारले. या प्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, हिंदुत्वनिष्ठ किशोर पुकाळे, राजेंद्र पलनाटी, लक्ष्मीनारायण बामनला, कर सल्लागार गणेश वास्ते, हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments