धाराशिव |
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल आहे. यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवाय जागांवर दावे केले जात आहेत. अशातच धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चार पैकी तीन जागांवर दावेदारी केली आहे.
या दावेदारीमुळे महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भुम- परांडा- वाशी, तुळजापूर आणि कळंब - धाराशिव या जागांवर शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे.
यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्या मतदार संघात इच्छुक आहेत. जिल्ह्यातील इच्छुकांनी शरद पवारांची भेट घेत आपली मागणी मांडली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी त्याबाबतची माहिती दिली.
0 Comments