म्हशी चारण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून तिच्यासह दोन म्हशी जागेवरच भाजून मृत्युमुखी पडल्याची घटना बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे शिवारात बुधवारी दुपारी 4.30 च्या सुमारास घडली.
चिमा धनाजी सातपुते (वय 50, रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी) असे अंगावर वीज पडून जागेवरच मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.सचिन नवनाथ गाडेकर (रा.गाडेकर वस्ती, उपळाई ठोगे) यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे.
सचिन गाडेकर यांची चुलत बहिण चिमा सातपुते ही गावात तिच्या कुटुंबासोबत राहते. बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास ती महाडीक यांच्या शेतात 10 म्हैशी व 5 शेळ्या तसेच 2 दोन गायी चारत होती. दुपारी साडेचारच्या सुमारास पाऊस व विजेचा कडकडाट सुरु झाला. त्यानंतर मोठा आवाज होऊन विज चिमा जनावरे चारत असलेल्या ठिकाणी पडली. यात चिमा ही पूर्णपणे भाजली. तिचा जागेवरच मृत्यू झाला. दोन म्हैशीही मृत अवस्थेत दिसल्या. याबाबत हवालदार सर्जेराव गायकवाड तपास करीत आहेत.
0 Comments