India vs Canada: 'या' कारणाने रद्द होऊ शकतो भारत विरूद्ध कॅनडा सामना!


   
टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करतेय. यावेळी टीम इंडियाने आता पर्यंत लीग स्टेजमध्ये झालेले सर्व सामने जिंकले आहेत. तर आज चौथा आणि लीग स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरूद्ध रंगणार आहे. टीम इंडियाने यापूर्वीच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत विरूद्ध कॅनडा हा सामना फ्लोरिडामध्ये होणार असून तो रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. गेल्या काही दिवसांपासून फ्लोरिडामध्ये पाऊस आहे आणि यामुळे हा सामना रद्द होऊ शकतो अशी शक्यता आहे. 

न्यूयॉर्कहून 1850 किमीचा प्रवास करून टीम इंडिया फ्लोरिडाला पोहोचली आहे.  भारत विरुद्ध कॅनडा सामन्यापूर्वी फ्लोरिडा शहरात तीन दिवस मुसळधार पाऊस आणि पुराचा इशारा देण्यात आला आहे. ग्रुप ए मधील उर्वरित तीन सामने फ्लोरिडामध्ये होणार आहेत. 15 जून रोजी होणाऱ्या भारत-कॅनडा सामन्यात 86% पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत आधीच सुपर-8 मध्ये पोहोचली आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास टीम इंडियाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही.

Post a Comment

0 Comments