सोलापूर | तू मला आवडतेस, लग्न कर नाहीतर तुझ्यासह घरच्यांना मारून टाकेल..


पाच महिन्यांपासून तरुणीचा पाठलाग करुन वाटेत गाठायचे. तु मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर नाही तर तुझ्या वडिलांसह घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अश्लीत वर्तन करणाऱ्या मजनुविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शहरातील एका नगरामध्ये व परिसरात जानेवारी ते १० जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे पिडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. एका २३ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच फिर्यादीत म्हणण्यात आले आहे की, यातील पिडित तरुणी ही १८ वर्षाची असून, ती सज्ञान आहे.

आई-वडिल मोलमजुरी करुन उपजीविका भागवतात. पिडित तरुणही मदत म्हणून काम करते. जानेवारी २०२४ मध्ये तिच्या शाळेतील नमूद आरोपी तिचा पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र वारंवार तो पाठलाग करु लागला आणि एके दिवशी भेटून त्याने 'तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या वडिलांसह घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली. घाबरुन पिडिता आरोपीच्या बाईकवर बसली. कँटीनवर चहा घेऊन वाटेत त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच वडिलांनाही पिडितेचे लग्न करुन देण्यासाठी ठार मारण्याची धमकी देत असल्याने ठाण्यात तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक़ कडू करीत आहेत.

Post a Comment

0 Comments