श्रद्धा कपूर होणार मोदी घराण्याची सून; जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली?श्रद्धा कपूर अनेकदा सोशल मीडियावर तिच्या फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांसोबत तिच्या मनातील भावना शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. श्रद्धा तू झुठी मैं मक्कराचे लेखक राहुल मोदी याला डेट करत आहे. मात्र, अभिनेत्री किंवा राहुलने या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

अलीकडेच अभिनेत्रीने राहुल मोदींना डेट करत असल्याची कबुली दिली आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये राहुलसोबतचा एक फोटो शेअर करून डेटिंगच्या बातम्यांना प्रोत्साहन दिल आहे. श्रद्धाने पोस्ट केलेला फोटो हा एक सेल्फी आहे ज्यामध्ये श्रद्धा कॅमेऱ्यासमोर हसत आहे तर राहुलने विचित्र चेहरा केला आहे.

फोटो शेअर करताना श्रद्धाने लिहिले की, “तुझ्या हृदयाची काळजी घे, कृपया तुझी झोप परत दे, मित्रा.” श्रद्धाने राहुलला चित्रात टॅग केले आहे आणि त्यावर हार्ट इमोजीही बनवला आहे. श्रद्धा आणि राहुलचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

गेल्यावर्षी श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी बऱ्याचवेळा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा देखील पसरल्या होत्या. यावर्षी मार्च महिन्यामध्ये ते दोघे एका मित्राच्या लग्नातही गेले होते. त्यावेळी श्रद्धा कपूरने आपल्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले होते. त्याचवेळी राहुलने देखील आपले फोटो शेअर केलेले होते. त्यावेळी लोकेशनवरून हे दोघेही एकाच ठिकाणी व्हेकेशनवर असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या.

2023 मध्ये, श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या अफवा पसरल्या होत्या. राहुल मोदी हे प्रसिद्ध चित्रपट लेखक आहेत. तो प्यार का पंचनामा 2, सोनू के टीटू की स्वीटी आणि तू झुठी मैं मकर यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. यापूर्वीही श्रद्धा आणि राहुल अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. जामनगरमध्ये अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्येही दोघे एकत्र दिसले होते.

Post a Comment

0 Comments