सानिया व शमी लग्नबंधनात अडकणार ? सानियाच्या वडिलांनी सोडले मौन


सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी म्हणजे क्रीडा क्षेत्रातील दोन प्रसिद्ध चेहरे. दोघांनीही भारताचे प्रतिनिधित्व करताना तिरंग्याची शान वाढवली. मोहम्मद शमीने क्रिकेटमध्ये तर सानिया मिर्झाने टेनिसमध्ये आपला ठसा उमटवला. खरे तर दोन्हीही स्टार खेळाडू त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत असतात. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाला आहे, तर मोहम्मद शमी देखील त्याची पत्नी हसीन जहाँपासून विभक्त झाला आहे. त्यामुळे शमी आणि सानिया हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा मागील काही कालावधीपासून रंगली आहे. अशातच आता सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे.

सानियाच्या वडिलांनी सोडले मौन वन डे विश्वचषक २०२३ मध्ये मोहम्मद शमीने शानदार कामगिरी करताना सर्वाधिक बळी घेतले. सानिया मिर्झा मागील काही कालावधीपासून खूप चर्चेत आहे. तिचा माजी पती शोएब मलिकने पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री सना जावेदशी विवाहगाठ बांधली. शोएबने तिसऱ्यांदा तर सनाने दुसऱ्यांदा लग्न केले. मात्र, सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली असताना सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचे म्हटले. इमरान मिर्झा म्हणाले की, हे सर्वकाही खोटे आहे, सानिया शमीला कधी भेटली देखील नाही.

Post a Comment

0 Comments