आमदार राजेंद्र राऊत मध्यरात्री जरांगे पाटील यांच्या भेटीला, राऊत यांची शिष्टाई कामी येणार ?

बार्शी |

पाचव्या दिवसानंतर देखील जरांगे पाटील हे आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. सगेसोयरेसह मराठा आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे.

मध्यरात्री बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांच्यासोबत बातचीत केली. यावर जरांगे म्हणाले, ते निरोप घेऊन आले होते. तो कोणत्याही पक्षाचा आमदार असो, मला त्याच्याशी घेणंदेणं नाही. मात्र, मदतीसाठी ते प्रयत्न करत आहेत. चर्चा तर घडून आलीच पाहिजे. सरकारने त्यांच्यामार्फत सांगितले आहे की, आम्ही ताबडतोब विषय तडीस काढू. फक्त सलाईन लावून घ्यावी. सरकारच्या शब्दाला मान देऊन सलाईन घेतले. त्यांनी विषय तडीस नेला नाही तर पुन्हा सलाईन काढू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.

मध्यरात्रीच आमदार राजेंद्र राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली. दोन मंत्र्याचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments