मोठी बातमी! चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीलाराज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. त्यांचा फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना नेते अंबादास दानवे आणि अनिल परब देखील होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा भरवला.


चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात उद्धव ठाकरेंच्या भेटीस सत्ताधारी नेते चंद्रकांत पाटील आले होते. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनाला उभे राहिले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवेंना चॉकलेट भेट दिलं. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील चॉकलेट भेट दिलं.


यावेळी उद्धव ठाकरे, अंबादास दाने आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बातचीत झाली. यावेळी अनिल परब देखील उपस्थित होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मिठाई भरवत अनिल परब यांचं अभिनंदन केलं. दोघांमध्या काय चर्चा झाली याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाही.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी अधिवेशनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. विशेष म्हणजे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंप्रमाणे अधिवेशनात विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट देत स्वागत केलं.

विधीमंडळात पावसाच्या अधिवेशनात आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभा परिसरात विरोधक आंदोलन करत असून जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments