बार्शी | रोडरोमियोचा अल्पवयीन वाहन चालकावर नियंत्रण ठेवण्याचे ठेवण्यासाठी निवेदन


  बार्शी |

 शहरातील कॉलेज, शिकवणी भागात मुलींना रोड रोमियों पासून होणाऱ्या त्रासाच्या व अल्पवयीन वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व मातंग एकता आंदोलन वतीने बार्शी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे  यांना निवेदन देण्यात आले.

बार्शी शहरात शाळा कॉलेज खाजगी क्लास सुटल्यानंतर रोड रोमिओचा मुलींची छेडछाड करण्याच्या प्रमाण वाढले आहे प्रत्येक चौकातील कोपरे धरून मुलं बसलेली असतात त्याचबरोबर त्यांच्याकडील गाड्यांचा कर्णकर्कश हॉर्न वाजवत जातात फॅन्सी नंबर प्लेट असते गाडीचा नंबर नीट ओळखता येत नाही यामध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण जास्त दिसून येते ही बाब ओळखून पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.
    
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा ताई शिवपुरे , राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष विक्रमसिंह पवार, उपाध्यक्ष सुमित खुरंगले , उपाध्यक्ष रवी भाऊ थोरात, शहर संघटक हनुमंत अण्णा साळुंखे, युवकचे संघटक सूर्या मस्के आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments