लग्नासाठी सोनाक्षी सिन्हा हिंदू धर्म सोडणार?, होणाऱ्या सासऱ्याने स्पष्टच सांगितलं


 बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. गुरुवारी, शत्रुघ्न यांनी आपल्या पत्नीसह मुलीच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांची भेट घेतली. काही दिवसांपासून माध्यमांत शत्रुघ्न सिन्हा या लग्नाबाबत नाखुश असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, या भेटीनंतर या चर्चा आता कुठेतरी थांबल्या आहेत.

अशात सोनाक्षीच्या होणाऱ्या सासऱ्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सोनाक्षी मुस्लिम अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे. अशात ती लग्नानंतर हिंदू धर्म सोडणार का?, ती इस्लाम धर्म स्वीकारणार काय?, अशा चर्चा रंगत होत्या. याबाबत आता सोनाक्षीचे होणारे सासरे इक्बाल रतनसी यांनी खुलासा केला आहे.

लग्नानंतर सोनाक्षी धर्म परिवर्तीत करणार?
अभिनेता जहीर इक्बाल हा प्रसिद्ध उद्योगपती इक्बाल रतनसी यांचा मुलगा आहे. त्यांचे सलमान खानसोबत खूप चांगले संबंध आहेत. अशात लग्नापूर्वी इक्बाल रतनसी यांनी सून सोनाक्षी सिन्हाबद्दल मोठं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी सोनाक्षीच्या धर्मांतराच्या अफवांवरही खुलासा केला.

“सोनाक्षी आणि जहीर यांचं मनोमिलन झालं आहे. त्यांचे हृदय जुळले आहे. त्यामुळे यामध्ये धर्माचा कुठेच विषय येत नाही. हिंदू भगवान म्हणत असतील किंवा मुसलमान अल्लाह पण शेवटी आपण सर्व मनुष्य आहोत. माझा आशिर्वाद दोघांसोबत आहे.”, असं इक्बाल रतनसी यांनी म्हटलं आहे.

सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नाची तयारी सुरू
इक्बाल रतनसी यांच्या या वक्तव्यानंतर सोनाक्षी धर्मांतर करणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान,  मागच्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणारे सोनाक्षी आणि जहीर आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सोनाक्षीच्या लग्नानिमित्त शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील ‘रामायणा’ बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments