महाराष्ट्र हादरला ! ‘तुला खाऊ देतो’ म्हणत 6 वर्षाच्या चिमुकलीला शेतात नेलं अन्…


महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. जळगावमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामुळे जळगावसह महाराष्ट्र हादरला आहे.

खाऊचं अमिष दाखवून शेतात नेण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मात्र घडला प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून या नराधमाने चिमुकलीची हत्या केली आहे. जळगावातल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.

सहा वर्षांच्या चिमुकलीला तुला खाऊ देतो आणि खेळायला मोबाईल देतो, असं म्हणत नराधमाने चिमुकलीला आपल्यासोबत घेतलं. फोन आणि खाऊचं आमिष दाखवून आरोपी अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन गेला. त्यानंतर एका शेतात त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

ही घटना कुणाला कळू नये, म्हणून स्वत:च्या बचावासाठी त्याने या चिमुकलीची हत्या केली अन् या सगळ्यानंतर स्वत: मात्र पळून गेला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवर संताप व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की “या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध अपहरणाचा कलम तसेच खुनाच्या कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीच्या अटकेसाठी तब्बल दहा पथक जवळपासच्या जंगलासह विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments