मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा
माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला मौलवीकडे आपल्या उपचारासाठी गेली असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मौलवीकडे उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार केला आणि तिचा व्हिडीओ देखील काढण्यात आला, असा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना घडली. 

उपचारासाठी तो एका खोलीत घेऊन गेला आणि तिथं बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिला बिजनौरची आहे. मागच्या आठवड्यात मंगळवारी महिलेने सीनियर पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार मी झाडू फूंकच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी बिदायूमध्ये राहते. दर्गा ठिकाणी ओढणी आणि चादरीचं दुकान असलेल्या ठिकाणी मौलवीने तिला उपचाराचं आश्वासन दिलं आहे. उपचाराचे कारण सांगून त्या महिलेला तो खोलीत घेऊन गेला. त्यावेळी मौलवीने तिच्यावर बलात्कार केला.

उपचार करतो असं सांगून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा दावा पीडित महिलेनं केला आहे. तर तिचा व्हिडीओ देखील शूट करण्यात आल्याचा धक्कादायक दावा पीडित महिलेचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचं काम केलं आहे. 

मानसिक आजारांवर झाड-फूंकच्या माध्यमातून उपचारासाठी अनेक लोकं लांबून येत असतात. कोतवाली क्षेत्रात बदायू-दिल्ली मार्गावर सोत नदी किनाऱ्यावर ‘बड़े सरकार’ चा प्रसिद्ध दर्गा आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments