बार्शी बृहत सोसायटी निवडणुकीत सोपल गटाचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी


 बार्शी  येथील बार्शी बृहत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित बार्शी या सोसायटी मतदार संघाच्या ३९० सदस्यांतून १३ जागांसाठी सन २०२१-२२ ते २०२६-२७ या पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया पार पडली. ३४४ मतदारांनी अत्यंत चुरशीच्या झालेल्या व रविवारी दि.८ रोजी निकाल घोषित झालेल्या या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप सोपल गटाचे कपबशी चिन्हावर उभे असलेले सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी झाले. विजयी झालेल्यांमध्ये सर्वसाधारण मतदार संघातून दत्तात्रय शिंदे, अमोल मांगडे, विनोद बगले, सुरेश पाटील, शरद पाटील, संतोष सावळे, सागर बारंगुळे, भाउसाहेब गुंड, महिला राखीव संघातून अंबिका बगले, राधा मांगडे, इतर मागास प्रवर्ग संघातून मधून गोवर्धन नाळे, विमुक्त जाती मतदार संघातून अरुण येळे, अनुसूचीत जाती मतदार संघातून मनिषा कांबळे अशा १३ सदस्यांनी विजय संपादन केला आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.एस.महाडिक यांनी कामकाज पाहिले.
 
याप्रसंगी अॅड.दिलीप सोपल म्हणाले, तालुक्यातील शेतीशी निगडीत असलेल्या मतदारांचे यात मतदान होते, या सोसायटीवर पूर्वी अनेक वर्षे कै.महादेव राउत, कै.तानाजी मांगडे आदींनी चांगल्या पध्दतीने कामकाज पाहिले. पूर्वी या छोट्या सोसायट्यांसाठी ठराव करुन हे अधिकार दिले जात व निवडणुका होत असे, आता शासनाच्या नवीन धोरणानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या अंतर्गत शासकिय पातळीवरुन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात होत आहेत. ज्यांचा फारसा काही संबंध नाही अशा लोकांनीही यात भाग घेतला. ज्यांची निवडणुकीत उभे रहायची इच्छा नाही अशांनीही राजकिय, आर्थिक दडपणाखाली सहभाग घेतल्याचे दिसून आले. निवडणुकात लढेल पडेल हे होत असते, आपल्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक प्रत्येक मतदारांच्य घरी जावून त्यांना समजून सांगतून चांगल्या पध्दतीने निवडणूक पार पडली, विजयी झाले, परिश्रम घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचेही यानिनिमित्त आभार मानत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

Post a Comment

0 Comments