वैराग! महाराजांच्या पुतळ्यावरील झाकलेले कवच काढावे; बसपाचे निवेदनवैराग/प्रतिनिधी:

बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने नगर पंचायत वैराग मुख्याधिकारी वीणा पवार यांना निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवारीच्या टोकावर ती स्वराज केली परंतु त्यांच्यात राज्यांमध्ये वैराग नगरपंचायत सारख्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला झाकण्याचे काम प्रशासनाने केले आहे, याचा बहुजन समाज पार्टी निषेध करत आहे. येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या वरचे झाकलेले कवच काढून टाकण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी करत आहे.

ज्या छत्रपती शिवराय यांच्या नावावरती प्रस्थापित राजकारणी वापर करत आहेत आणि सत्ता काबीज करत आहेत परंतु जनतेला जनतेला फसवून नौटंकी करून छत्रपती शिवाजी महाराजांवर झाकलेले कवच काढण्याचे मनापासून काम करत नाहीत, तरी प्रशासनाने या गोष्टीची दखल न घेतल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष विलास शेरखणे,  कुमार कांबळे, वैराग शहर अध्यक्ष ताजोदीन शेख, परमेश्वर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments