भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात आमदार एकटवले, ‘देशद्रोही’ म्हणत पदावरुन हटवण्याची मागणी



 देशात सध्या पाच राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये मतदान पार पडले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये देखील दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरळीत पार पडले. तसेचभाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये एकूण 62.5 टक्के मतदान झाले. मात्र पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपमधील खदखद बाहेर आली असून उमेदवारांनी थेट प्रदेशाध्यक्षांनाच हटवण्याची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तराखंडचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी भाजप विरोधात काम केले. माझ्या विरोधात उभ्या असणाऱ्या बसपाच्या उमेदवारांना त्यांनी समर्थन दिले. ते देशद्रोही आहेत. मी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करतो, असे लक्सरचे आमदार आणि विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार संजय गुप्ता यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

उत्तराखंडमध्ये 70 विधानसभा जागा असून या सर्व जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 वाजेपर्यत सुरू होती. राज्यात एकूण 62.5 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. कोरोनामुळे मतदान कमी झाले असले तरी मतदारांचा उत्साह मात्र प्रचंड दिसला.



 

 

Post a Comment

0 Comments