काही दिवसांपूर्वी पनामा पेपर्स प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी गैरमार्गाने पैसा परदेशात ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. अशातच बाॅलिवूडची स्टार अभिनेत्री ऐश्वर्या राॅय बच्चनला ईडीने समन्सकडून बजावण्यात आलं होतं.
पनामा पेपर्स प्रकरणी ऐश्वर्या राॅयला ईडी कार्यालयात बोलावलं होतं. यानंतर ऐश्वर्या चौकशीत सहभागी होण्यासाठी ईडीच्या दिल्ली कार्यालयात पोहोचली होती. ऐश्वर्याची ईडीने तब्बल 5 तास चौकशी केली आहे. पाच तास चौकशीनंतर ऐश्वर्या राॅयला सोडण्यात आलं आहे. अशातच याच मुद्द्यावरून ऐश्वर्या राॅयच्या सासू आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन संसदेत भाजपवर संतापल्याचं पहायला मिळालं आहे
लवकरच तुमचे वाईट दिवस येणार आहेत. मी शाप देते, असं जया बच्चन भाजप खासदारांना उद्देशून म्हणाल्या आहेत. संसदेत काही भाजप खासदारांनी वक्तव्य केली असल्याचा आरोप जया बच्चन यांनी केला आहे. त्यानंतर राज्यसभेत गोंधळ उडाल्याचं देखील पहायला मिळालं होतं. वयक्तीत बाबतीत बोल्याने मी नाराज झाले होते, असंही जया बच्चन म्हणाल्या आहेत.
0 Comments