एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी साडेपाच लाख रुपयांची रक्कम परस्पर गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, सी.एम.एस. इन्फो सीस्टीम लिमिटेड कंपनीतील शाखा व्यवस्थापक सुहास कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अक्षय पुंडे (वय २८) यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सी.एम.एस. इन्फो सीस्टीम लिमिटेड ही कंपनी एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम करते. ह्या कंपनीचे सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी या कंपणीसोबत करार झालेला असुन त्यामधे आमचे सीएमएस इन्फो कंपनीतर्फे सर्व राष्ट्रीयकृत बँकेतुन रक्कम काढुन ठरवुन दिलेल्या ए.टी.एम. मधे भरली जाते. त्याकरीता आमच्याकडे काही मुले कस्टोडीयन म्हणुन काम करतात. सदर रक्कम ए.टी.एम मधे भरलेबाबत कंपनीचे ऑडीयटर योगेश भिमाकरराव बामनोटे चेक करतात.
दिनांक- 30/12/2019 रोजी अक्षय पंडीत मुंडे, रा-उकडगाव, ता-बार्शी याची आमच्या कंपनीत कस्टोडीयन म्हणुन नेमणुक झाली होती. त्याच्याकडे आमचे कंपनीतर्फे बार्शी तालुका तसेच परांडा, भुम, कुर्डुवाडी अशा सर्व राष्ट्रियकृत आणि प्रायव्हेट बँकेतुन रक्कम काढुन ती त्या बँकेचे संबंधीत ए.टी.एम. मधे पैसे भरण्याचे काम होते. ऑडीयटर योगेश भिमाकरराव बामनोटे,रा-स्वागत कलनी कार्ला चौक वर्धा यांनी खालीलप्रमाणे ATM चेक केले
असता
त्यांना दिनांक-27/07/2021 रोजी कुर्डुवाडी SBI ATM 1000/-रु,दि-29/7/2021 रोजी तुळजापुर रोड बार्शी SBI ATM मधे 12500/-रु, दि-04/08/2021 बार्शी SBI ATM मधे 18500/-रु,दि-28/7/2021 रोजी वैराग SBI ATM मधे 500/-रु, दि-01/08/2021रोजी उपळाई रोड बार्शी SBI ATM मधे 600-रु , दि-03/08/2021 रोजी परांडा रोड SBI ATM मधे 52500/-रु दि-03/08/2021 रोजी टेलीफोन नगर SBI ATM मधे 11500/-रु ,दि-28/07/2021 रोजी ओम हटेल उपळाई रोड येथील AXIS BANK ATM मधे 500/-रु,दि-28/07/2021 रोजी वैराग BANK OF INDIA ATM मधे 500/-रु, दि-30/07/2021 रोजी बार्शी पांडे चौक येथील IDBI ATM मधे 500/-रु असे एकुण 104,600 रु कमी असल्याचे आढळुन त्यावेळी ऑडीटर यांनी आमचे कंपनीस रिपोर्टद्वारे कळविले असता त्याबाबत अक्षय मुंडे याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरची रक्कम मी परत देईन असे सांगितले होते परंतु त्यानी रक्कम परत दिली नाही.
तसेच दिनांक-02/08/2021 रोजी बार्शी येथील आय.डी.आय बँकेतुन 10,00000/-(दहा लाख) रुपये काढुन ए.टी.एम मधे भरणे होते त्यावेळी त्याने आय.डी.बी.आय शाखा बार्शी या बँकेतुन त्याने वरील रक्कम काढली व ती रक्कम पांडे चौक येथील ए.टी.एम मधे भरली व तसा आम्हास रिपोर्ट दिला. दिनांक-07/08/2021 रोजी सदरचे ए.टी.एम बंद पडलेबाबात आमचे सिस्टीमवर आम्हाला समजुन आले त्यानंतर सदर ए.टी.एम.दुरुस्ती करण्यासाठी आमच्या कंपनीतील ऑडीटर योगेश भिमाकरराव बामनोटे, रा-स्वागत कलनी कार्ला चौक वर्धा व त्याचेसोबत कुलदिप दत्ताञय जाधव, रा-आगळगाव, ता-बार्शी यांनी सदर ए.टी.एम दुरुस्त केले त्यावेळी त्यांना असे आढळुन आले की,सदर ए.टी.एम. मशीनमधे 400000/-(चार लाख) रुपये कमी आहेत याबाबत त्यांनी आमच्या कंपणीस रिपोर्टद्वारे कळविले. सदर रकमेबाबत मी अक्षय मुंडे याचेकेडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली व मी पैसे घेतले नाहीत मला सदर रकमेबाबत काहीएक माहीती नाही व सदर ATM मशीनचे अँडमिन कार्ड आमचेकडे दिले नाही.
तरी दिनांक-27/07/2021पासुन ते 02/08/2021 रोजी पर्यंत एकुण 504600/-रुपये अक्षय पंडीत मुंडे, वय 28 वर्षे, रा-उकडगाव, ता-बार्शी जि. सोलापुर याने वेळोवेळी वरीलप्रमाणे रक्कम न भरता सदर रक्कमेचा अप्रामाणिकपणे बुध्दीपरस्परपने अपहार करुन सदर बँकेच्या ATM मधे न भरता स्वतःच्या फायद्याकरीता अपहार केला आहे म्हणुन माझी त्याच्याविरुध्द फिर्याद आहे.
1 Comments
👍👍👍
ReplyDelete