एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याची पंढरपूरमध्ये आत्महत्या


एसटी महामंडळाच्या पंढरपूर आगारातील कर्मचारी दशरथ गिड्डे याने बुधवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गिड्डे यांच्या आत्महत्येने एसटी कर्मचाऱ्यांनमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.

मोहोळ येथील दशरथ गिड्डे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे एसटीच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत.

दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. पहाटे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.

Post a Comment

1 Comments

  1. भारत देशात नोकरदार आणि शेतकरी लोकांना किंमत नाही
    किंमत आहे ती फक्त दोन नंबर चे उद्योग धंदे करणाऱ्यांना

    ReplyDelete