पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारला उपरोधिक टोला


पेट्रोल-डिझेलच्या किमतीने केव्हाच शंभरी पार केली आहे त्यामुळे नागरिक व सर्वसामान्य जनता त्रस्त झालेले आहे. सध्या वाढत्या इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या विरोधात जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. या वाढत्या इंधन दरवाढीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोदी सरकारवर निशाणा सोडला. केंद्राकडून सध्या पेट्रोल, डिझेलची जी दरवाढ केली जात आहे ती आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरत असल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढे वाढले, डिझेलचे भाव तेवढे झाले. हे आपल्या भल्यासाठीच होतेय.

Post a Comment

1 Comments

  1. पण पेट्रोल डिझेल स्वस्त झालेले महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये बसत नाही

    ReplyDelete