"राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठी अशा धाडी"- जयंत पाटील


अनिल देशमुख यांच्या घरावर धाड टाकताना बाहेरील सामान CBI च्या अधिकाऱ्यांनी घरात नेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी शनिवारी केला.

भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आज सीबीआयने धाड टाकली. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सीबीआयवर राजकीय उद्दिष्टे साध्य करत असल्याचा आरोप करताना धाडीचा निषेध केला. 

ॲन्टीलियाजवळ सापडलेली स्फोटके आणि हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीच्या संदर्भात मिळालेल्या परवानगीचा दुरुपपयोग सीबीआय करत आहे, आरोपही जयंत पाटील यांनी लगावला.

Post a Comment

0 Comments