क्रिकेट हा सभ्य आणि सुसंस्कृत लोकांचा खेळ समजला जातो. भारतात तर क्रिकेट एखाद्या धर्माप्रमाणे धरला जातो. क्रिकेटवर आणि क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर देखील चाहते भरभरून प्रेम करतात. त्यामुळे सामना जिंकला तरी आणि हारला तरी भारतीयांच्या भावना ह्या क्रिकेट बद्दल तीव्र असतात.
मॅच फिक्सिंग हा क्रिकेटमध्ये गुन्हा मानला जातो. हा आरोप जर एखाद्या खेळाडूवर सिद्ध झाला तर त्याच्यावर क्रिकेट खेळण्याची काही वर्षांसाठी किंवा कायम बंदी घालण्यात येते. श्रीसंत वर देखील हा आरोप होता. त्यामुळे त्याच्यावर सात वर्ष क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.
असे असले तरी, तो मनोरंजनाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सतत भेटत होता. बिग बॉस हिंदी मध्ये देखील त्याने सहभाग नोंदवला होता.आता तो सय्यद मुश्ताक अली टी २० स्पर्धेतून पुनरागमन करताना दिसेल.
त्याच्यावर घालण्यात आलेल्या सात वर्षांच्या बंदीचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. केरळ क्रिकेट संघटनेकडून त्याचा संघात समावेश केला गेला आहे.
0 Comments