३८०० धनादेशचे देऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतकऱ्यांची थट्टा : देवेंद्र फडणवीस


१ ते १४ ऑक्टोबर या काळात मोठा पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. कापणीला आलेली पिके आणि कापलेली पिके दोन्हींचे मोठे नुकसान. आठ-आठ दिवस प्रशासन पोहोचले नाही, अशी अवस्था अनेक ठिकाणी आहे. जमीन मोठ्या प्रमाणात खरडली गेली आहे. त्यामुळे पुढचे पीक घेणे अशक्य. आमच्या काळात यासाठी वेगळी मदत देण्यात आली होती.
________________________________________
📢
_____________________________________

सर्वच पिकांचे मोठे नुकसान. सरकारने तत्काळ पंचनामे संपवून, अगदी मोबाईल फोटो ग्राह्य धरून लगेच मदत दिली पाहिजे.काल जसे ३८०० रुपयांचे धनादेश दिले, तशी थट्टा पुन्हा शेतकऱ्यांची करू नये, अशी माझी विनंती आहे.जी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यावेळी घेतली होती, त्याची पूर्तता करण्याची संधी आता या सरकारकडे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आता त्याचप्रमाणे मदत करावी: देवेंद्र फडणवीस यांनी दाखविले जुने व्हिडिओ.
___________________________________
📢
_______________________________________

ही वेळ राजकारण करायची नाही. अधिक संवेदनशील राहण्याची आहे. सतत केंद्र सरकारकडे बोट दाखविणे सुद्धा योग्य नाही. केंद्र सरकार तर मदत देईलच.केंद्र सरकारची प्रक्रिया सर्वांना ठावूक आहे. आधी राज्य सरकारचा प्रस्ताव सादर करावा लागेल. मा. पंतप्रधान मोदीजी आधीच्या सरकारपेक्षा निश्चितपणे अधिक मदत करतील. तशी त्यांनी यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राला केली आहे.

 जीएसटी संदर्भात सातत्याने गैरसमज पसरवले जातात. तो सुद्धा निधी राज्याला येतोय आणि यापुढेही येणार. 
केंद्राकडे बोट आणि जीएसटीचे कारण याबाबत या ३ पक्षांमध्ये एकमत.

राजकीय भाष्य सोडून शेतकऱ्यांना मदत करा. शेतकऱ्यांना राजकारणात रस नाही. मलाही यात राजकारण आणायचे नाही.या सरकारचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी सध्या श्री शरद पवार यांना प्रयत्न करावे लागतात, हे दुर्दैवी आहे.
 मी यापूर्वीच केंद्र सरकारला विनंती केली आहे. राज्याचा प्रस्ताव येताच तातडीने मदत करण्याची विनंती, मी मा. अमित शाह यांना केली आहे. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा आपण विनंती करणार आहोत.जलयुक्त शिवारची चौकशी जरूर करावी. यातील कोणतेच काम मंत्रालयातून मंजूर झालेले नाही. स्थानिक स्तरावर कामांच्या मंजुरीचे अधिकार. ६ लाखांवर कामे, त्यात आलेल्या तक्रारी ७००. नक्की चौकशी करा.

Post a Comment

0 Comments