आयपीएलच्या मध्यांतरानंतर अजिंक्य रहाणे दुसऱ्या संघात जाणार?


प्रशिक्षक रिकी पॉन्टिगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करतेय. मात्र अजूनही या संघात अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला संधी न दिल्याने सीजनच्या मध्यांतरात तो दुसऱ्या संघात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सीजनच्या मध्यांतरात मीड सिजन ट्रान्सफरला सुरुवात होईल. ज्यामध्ये टीम त्यांना हव्या त्या खेळाडूंची देवाण-घेवाण करू शकते. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज ओपनींग फलंदाजीसाठी रहाणेचा विचार करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची कामगिरी चांगली होत होतेय. त्यामुळे अजिंक्य रहाणेला त्याची संधी येईपर्यंत वाट पहावी लागेल.

Post a Comment

0 Comments