शिवभोजन थाळ्यांचे विक्रमी वाटप

राज्यात दि. १ जुलै ते दि . १८ जुलै पर्यंत ८७० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे १७ लाख ६६ हजार ३३३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यातआले
असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४०, जून महिन्यात ३० लाख ९६ हजार २३२, जुलै मध्ये आतापर्यंत १७ लाख ६६ हजार ३३३ आणि असे एकूण दि. १ एप्रिल ते दि . १८ जुलै या कालावधीत १ कोटी ७ लाख ४५ हजार ८६२ शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments