दहावी पास आहात का?; परदेशात नोकरीची संधी



दहावी उत्तीर्ण व इंग्रजीचे ज्ञान असणाऱ्या तरुणांना इस्रायलमध्ये बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत ही संधी मिळणार आहे. इस्रायलमध्ये सुरुवातीच्या काळात आवश्यक सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक संगीता खंदारे यांनी दिली.

इस्रायलमध्ये काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ‘Maharashtra International portal’ पोर्टलवर जावे. त्या ठिकाणी लेटेस्ट जॉब या विभागात जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. महाराष्ट्र शासनाकडून उमेदवाराची निवड प्रक्रिया, आरोग्य तपासणी, पासपोर्ट, व्हिसा प्रक्रिया, मेडिकल विमा तसेच राहण्याची व जेवणाची सोय यासह इस्रायलमधील सुरुवातीच्या काळात आवश्यक सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही खंदारे यांनी म्हटले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 31 हजार रुपये पर्यंत मासिक वेतन मिळू शकते.

Post a Comment

0 Comments