परंडा प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने, मा.आ.राहुल (भैय्या) मोटे यांच्या मार्गदर्शनातून बाळासाहेब देशमुख उप प्रदेशाध्यक्ष तथाजिल्हाप्रमुख कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.) यांच्या वतीने परंडा तालुक्यातील कपिलापुरी येथे गावासह वाड्या वस्त्या वरील गरजू शेतकऱ्यांना आवश्यक किराणा धान्य किट वाटप करण्यात आले.
महापुराने थैमान घातलेले ८-१० दिवस जनजीवन विस्कळीत झालेले होते,परंडा कुर्डुवाडी चा पूर्ण पणे संपर्क तुटलेला होता. अशातच मा.आ.राहुल (भैय्या) मोटे यांनी शेतकऱ्यांना किराणा किट पुरवठा करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.)परंडा चे पदाधिकारी उपस्थिती होते.
0 Comments