रामपाल महाराजांची भक्ती करू नको म्हटल्याच्या कारणावरून मुलानेच केला बापाचा खून; धाराशिव हादरले



धाराशिव तालुक्यातील पळसप येथे एक दुर्दैवी घटना उघडकीला आली आहे, रामपाल महाराजांची भक्ती करू नको म्हटल्याच्या कारणावरून मुलानेच बापाचा खोऱ्याचा दांडा डोक्यात घालत निर्घृण खून केल्याची घटना उघडतेस आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी नामे वैभव चद्रकांत लाकाळ, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी ३१ जुलै रोजी रोजी २२.४५ वा. सु. पळसप येथे मयत नामे-चंद्रकांत मदन लाकाळ, वय 65 वर्षे, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने रामपाल महाराज यांची भक्ती करुन नको असे बोलण्याचे कारणावरुन खोऱ्याचे दांडयाने मारहाण करुन गंभीर जखमी जिवे ठार मारले. 

या घटनेची फिर्याद प्रमोद चंद्रकांत लाकाळ, वय 29 वर्षे, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि. 09.08.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे ढोकी येथे भा.न्या.सं. कलम 103 (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments